श्रीमद् भगवत गीता अध्याय १२ वा
Shri Mat Bhagwat Geeta Adhyay 12
Shri Mat Bhagwat Geeta Adhyay 12 is in Sanskrit. Here in this Adhyay 12 Bhagwan ShriKrishna is telling Arjuna, Which devotee is dear to him and what qualities are found in such devotees. We may have different ways of devotion explained in this Adhyay by God ShriKrishna.
श्रीमद् भगवत गीता अध्याय १२ वा
भक्तियोग
अर्जुन उवाच
एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ।
ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः ॥ १ ॥
श्रीभगवान उवाच
मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते ।
श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्ततमा मताः ॥ २ ॥
ये त्वक्षरमनिर्देश्यमव्यक्तं पर्युपासते ।
सर्वत्रगमचिन्त्यं च कूटस्थमचलं ध्रुवम् ॥ ३ ॥
सन्नियम्येन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः ।
ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः ॥ ४ ॥
क्लेशोऽधिकतरस्तेषामव्यक्तासक्तचेतसाम् ।
अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिरवाप्यते ॥ ५ ॥
ये तु सर्वाणि कर्माणि मयि संन्यस्य मत्पराः ।
अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते ॥ ६ ॥
तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात् ।
भवामि नचिरात्पार्थ मय्यावेशितचेतसाम् ॥ ७ ॥
मय्येव मन आधत्स्व मयि बुद्धिं निवेशय ।
निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशयः ॥ ८ ॥
अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् ।
अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनञ्जय ॥ ९ ॥
अभ्यासेऽप्यसमर्थोऽसि मत्कर्मपरमो भव ।
मदर्पमपि कर्माणि कुर्वन्सिद्धिमवाप्स्यसि ॥ १० ॥
अथैतदप्यशक्तोऽसि कर्तुं मद्योगमाश्रितः ।
सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यतात्मवान् ॥ ११ ॥
श्रेयो हि ज्ञानमभ्यासाज्ज्ञानाद्ध्यानं विशिष्यते ।
ध्यानात्कर्मफलत्यागस्त्यागाच्छान्तिरनन्तरम् ॥ १२ ॥
अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च ।
निर्ममो निरहङ्कारः समदुःखसुखः क्षमी ॥ १३ ॥
सन्तुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्र्चयः ।
मय्यर्पितमनोबुद्धिर्यो मद्भक्तः स मे प्रियः ॥ १४ ॥
यस्मान्नोद्विजते लोको लोकान्नोद्विजते च यः ।
हर्षामर्षभयोद्वेगैर्मुक्तो यः स च मे प्रियः ॥ १५ ॥
अनपेक्षः शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथः ।
सर्वारम्भपरित्यागी यो मद्भक्तः स मे प्रियः ॥ १६ ॥
यो न हृष्यति न द्वेष्टि न शोचति न काङ्क्षति ।
शुभाशुभपरित्यागी भक्तिमान्यः स मे प्रियः ॥ १७ ॥
समः शत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः ।
शीतोष्णसुखदुःखेषु समः सङ्गविवर्जितः ॥ १८ ॥
तुल्यनिन्दास्तुतिर्मौनी सन्तुष्टो येन केनचित् ।
अनिकेतः स्थिरमतिर्भक्तिमान्मे प्रियो नरः ॥ १९ ॥
ये तु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते ।
श्रद्दधाना मत्परमा भक्तास्तेऽतीव मे प्रियः ॥ २० ॥
॥ हरि ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषसु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे भक्तियोगो नाम द्वादशोऽध्यायः ॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
वसुदेवसुतदेवं कंसचाणुरमर्दनम् ।
देवकी परमानंदम् कृष्णं वन्दे जगत्गुरुं ॥
मराठी अर्थ
अर्जुन म्हणाला
१) जे अनन्यप्रेमी भक्तजन पूर्वी सांगितल्याप्रमाणे निरंतर आपल्या भजन ध्यानात मग्न राहून आपणा सगुणरुप परमेश्र्वराची आणि दुसरे जे केवळ अविनाशी सच्चिदानंदघन निराकार ब्रह्माचीच अतिश्रेष्ठ भावाने उपासनाकरतात, त्या दोन्ही प्रकारच्या भक्तांमध्ये अतिशय उत्तम योगवेत्ते कोण होत?
२) श्रीभगवान म्हणाले
माझ्या ठिकाणी मन एकाग्र करुन निरंतर माझ्या भजन-ध्यानात रत झालेले जे भक्तजन अतिशय श्रेष्ठ श्रद्धेने युक्त होऊन मज सगुणरुप परमेश्र्वराला भजतात, ते मला योग्यांमधील अति उत्तम योगी वाटतात.
३-४) परंतु जे पुरुष इंद्रियसमूहाला चांगल्या प्रकारे ताब्यात ठेवून मन-बुद्धीच्या पलीकडे असणार्या, सर्वव्यापी, अवर्णनीय स्वरुप आणि नेहमी एकरुप असणार्या नित्य, अचल, निराकार, अविनाशी, सच्चिदानंदघन ब्रह्माची निरंतर ऐक्यभावनेने ध्यान करीत उपासना करतात, ते सर्व प्राणिमात्रांच्या कल्याणांत तत्पर आणि सर्वांच्या ठिकाणी समभाव ठेवणारे योगी मलाच येऊन मिळतात.
५) सच्चिदानंदघन निराकार ब्रह्मांत चित्त गुंतलेल्या त्या पुरुषांच्या साधनांत कष्ट जास्त आहेत. कारण देहाचा अभिमान असणार्यांकडून अव्यक्त ब्रह्माची प्राप्ती कष्टानेच होत असते.
६-७) परंतु जे मत्परायण भक्तजन सर्व कर्मे माझ्या ठिकाणी अर्पण करुन मज सगुणरुप परमेश्र्वराचीच अनन्य भक्तियोगाने निरंतर चिंतन करीत उपासना करतात; हे अर्जुना त्या माझ्यात चित्त गुंतवलेल्या प्रेमी भक्तांचा मी तत्काळ मृत्युरुप संसारसागरांतून उद्धार करतो.
८) माझ्यातच मन ठेव . माझ्या ठिकाणीच बुद्धी स्थापन कर. म्हणजे मग तू माझ्यातच राहशील, यात मुळीच संशय नाही.
९) जर तू माझ्यात मन निश्र्चल ठेवायला समर्थ नसशील, तर हे अर्जुना, अभ्यासरुप योगाने मला प्राप्त होण्याची इच्छा कर.
१०) जर तू वर सांगितलेल्या अभ्यासालाही असमर्थ असशील, तर केवळ माझ्याकरता कर्म करायला परायण हो. अशारीतीने माझ्यासाठी कर्मे केल्यानेही 'माझी प्राप्ती होणे ' ही सिद्धी तू मिळवशील.
११) जर माझी प्राप्तिरुप योगाचा आश्रय करुन वर सांगितलेले साधन करायलाही तू असमर्थ असशील, तर मन, बुद्धी इत्यादींवर विजय मिळविणारा होऊन सर्व कर्मांच्या फळांचा त्याग कर.
१२) मर्म न जाणता केलेल्या अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ होय. ज्ञानापेक्षा मज परमेश्र्वराच्या स्वरुपाचे ध्यान श्रेष्ठ आहे आणि ध्यानापेक्षाही सर्व कर्मांच्या फळांचा त्याग श्रेष्ठ आहे. कारण त्यागाने ताबडतोप परम शांती मिळते.
१३-१४) जो कोणत्याही प्राण्याचा द्वेष न करणारा, स्वार्थरहित, सर्वांवर प्रेम करणारा व अकारण दया करणारा, माझेपणा व मीपणा नसलेला, सुखांत व दुःखात समभाव असलेला आणि क्षमावान म्हणजे अपराध करणार्यालाही अभय देणारा असतो; तसेच जो योगी नेहमी संतुष्ट असतो, ज्याने शरीर, मन व इंद्रिये ताब्यात ठेवलेली असतात, ज्याची माझ्यावर दृढ श्रद्धा असते, तो मन व बुद्धी मलाच अर्पण केलेला माझा भक्त मला प्रिय आहे.
१५) ज्याच्यापासून कोणत्याही प्राण्याला त्रास होत नाही तसेच ज्याला कोणत्याही प्राण्याचा उबग येत नाही, जो हर्ष, मत्सर, भीती आणि उद्वेग इत्यादींपासून अलिप्त असतो, तो भक्त मला प्रिय आहे.
१६) ज्याला कशाची अपेक्षा नाही, जो अंतर्बाह्य शुद्ध, नेहमी दक्ष, तटस्थ आणि दुःखमुक्त आहे, असा कर्तृत्वाचा अभिमान न बाळगणारा माझा भक्त मला प्रिय आहे.
१७) जो कधी हर्षयुक्त होत नाही, द्वेष करीत नाही, शोक करीत नाही, इच्छा करीत नाही, तसेच जो शुभ आणि अशुभ सर्व कर्मांचा त्याग करणारा आहे, तो भक्तियुक्त पुरुष मला प्रिय आहे.
१८-१९) जो शत्रू-मित्र आणि मान-अपमान यांविषयी समभाव बाळगतो, तसेच थंडी-ऊन, सुख-दुःख इत्यादी द्वंद्वांत ज्याची वृत्ती सारखीच राहते, ज्याला आसक्ती नसते, ज्याला निंदा-स्तुती सारखीच वाटते, जो ईशस्वरुपाचे मनन करणारा असतो, जो काही मिळेल त्यानेच शरीरनिर्वाह होण्याने नेहमी समाधानी असतो, निवासस्थानाविषयी ज्याला ममता किंवा आसक्ती नसते, तो स्थिर बुद्धी असणारा भक्तिमान पुरुष मला प्रिय असतो.
२०) परंतु जे श्रद्धाळू पुरुष मत्परायण होऊन या वर सांगितलेल्या धर्ममय अमृताचे निष्काम प्रेमभावनेने सेवन करतात, ते भक्त मला अतिशय प्रिय आहेत.
अशारीतीने श्रीमद् भगवतगीतेमधिल श्रीकृष्ण-अर्जुन संवादांतील भक्तियोग नावाचा बारावा अध्याय संपूर्ण झाला.
श्रीमद् भगवत गीता अध्याय १२ वा Shri Mat Bhagwat Geeta Adhyay 12
Meaning in English
The way of devotion
Arjun said
1) Between those devotees who worship you, being thus ever devoted and those worship the imperishable, the unmanifest, who are better versed in Yoga?
Bhagwan said
2) those who worship me fixing their mind on me, ever devoted, and endowed with supreme faith-them I regard as the best Yogins.
3-4) But they who worship the Imperishable, Indescribable, Unmanifest, All-pervading, Inconceivable, Changeless,Immovable and Eternal, controlling well their senses, even minded everywhere and devoted to the good of all beings, (also) attain Me alone.
5) The trouble of those whose minds are attached to the unmanifest is greater; for the way of the unmanifest is attained with difficulty by the embodied soul.
6-7) Those, however, who renouncing all actions in Me, and being attached to Me, worship Me with unswerving devotion through mediation--these people, who have fixed their mind on Me, I quickly redeem from this ocean of transmigratory existence beset with death.
8) Fix your mind on me alone, let your intellect rest in Me, you will live in Me alone hereafter; there is no doubt (about it).
9) If, however, you are not able to fix the mind steadily on Me, then through the Yoga of practice seek to attain Me, O Dhananjaya.
10) If you are unable even to practise, then be solely devoted to rites for Me, even by doing rites for My sake, you will attain perfection.
11) If, however, you are unable to do even this, then taking refuge in Me and being self-controlled, renounce the fruit of all actions.
12) knowledge is superior to (mere) practice, meditation is superior to knowledge, superior to meditation is renunciation of the fruit of action, from renunciation results peace immediately.
13-14) Non-envious, friendly, and compassionate towards all being, free from ideas of possession and ego consciousness, sympathetic in pain and pleasure, forgiving, always contented, contemplative, self-controlled, of firm conviction with his mind and intellect dedicated to Me---such a devotee of Mine is dear to Me.
15) From whom the world gets no trouble, and who gets no trouble from the world, who is free from elation, jealousy, fear, and anxiety---he is dear to Me.
16) Independent, Clean, dexterous, indifferent, untroubled, and discarding all endeavours--such a devotee of Mine is dear to Me.
17) He who neither rejoices nor dislikes nor grieves nor desires, who renounces good and evil, and who is devoted, is dear to Me.
18-19) Alike to foe and friend, in honour and dishonour, in heat and cold, happiness and misery, free from attachment, alike in praise and censure, reticent, satisfied with anything, without a home, steady in mind---such a devoted person is dear to Me.
20) Those devotees who practise this nectar-like religion just taught faith, and with Me as their supreme goal, are extremely dear to Me.
Shri Mat Bhagwat Geeta Adhyay 12
श्रीमद् भगवत गीता अध्याय १२ वा
No comments:
Post a Comment