Durga Kavacha BrahmandaVijay Kavacha ब्रह्मांडविजयं दुर्गा कवचम्
Durga Kavacha (BrahmandaVijay Kavacha)
This is a GoddessDurga Kavacha. It is in Sanskrit. It can be called as a prayer made to the goddess Durga for protecting our body and removing obstacles from our life. Name of this kavacha is BrahmandaVijay Kavacha). It is from, Brahmavaivarta Poorana. It is told to Maharshi Narad by God Narayan. O! Narad listen, I am telling you Kavacha of Goddess Durga. This was earlier told by god ShriKrishna in Vridavan of golok to god Brahma. Then it was told By God Brahma to God Shiva at the time of war with Demon Tripurasur. God Shiva then defeated and killed the demon. God Hari had given this kavacha to Gotam rushi ; who had given it to Padmasha who then defeated saptadipeshwar. Because of wearing and reciting this kavacha; God Brahma received knowledge and became powerful. God Shiva became Sarvadnyo and became Guru of yogis. Goutam rushi (who is like God Shiva) became head of all munies/rushies. 1 God Narayan is telling to Maharshi Narad; Rushi of this kavacha is Prajapati. Chanda is Gayatri. DurgatiNashini is goddess of this kavacha. For obtaining victory on this Brahmanda this kavacha is used. This kavacha is very holy and very powerful. Let mantra: ‘Om durgatiNashinai swaha’ protects my head. Let mantra: ‘Om hrim’ protect my forehead. Let mantra: ‘Om Hrim Shrim’ always protects my both eyes. I bow to Durga devi and ask her to protect my both ears. Let mantra: ‘Om Hrim Shrim’ always protects my nose. Let mantra: ‘hrim shrim hum’ protects my teeth. Let mantra: ‘clim’ protects my lips. Let mantra krim, krim, krim protects my throat and let Goddess Durga protects my Gandam (cheeks), neck. 2. Let ‘Durgavinashinai Swaha’ always protects my shoulders. Let ‘vipadvinashinai swaha’ always protects my chest. Let mantra: ‘Durge Durge’ protects my naval. Let mantra: ‘Durge Durge Raksha Raksha’ protects my back. Let mantra: ‘Om hrim Durgayai swaha’ always protects my hands, feet and whole body. Let Goddess Mahamaya protects me from east. Let Goddess Kalika protects me from south-east. Let Daksha-Kanya protects me from south. Let Shivsundari protects me from south-west. Let Parvati protects me from west. Let Goddess Varahi protects me from north-east. Let Mother of Kubera protects me from north. Let Ishwari protects me from north-west. Let Goddess Narayani protects me from above. Let Goddess Ambika protects me from down (the nadir). In sleep and when I am awake; Let Goddess of knowledge protects me. 3. O! My son, I told you this kavacham; and the name of this kavacham is BrahmandVijay kavacha. By taking a bath at holy places or by performing Yagnyas whatever good fruits we receive; we receive same or even better fruits by reciting this Kavacha. Performing pooja of Guru by offering him sandal paste, clothes and ornaments and after taking his blessings, one should wear this kavacha around his throat/neck or around his shoulder. Such a person then becomes victorious by destroying his enemies. The devotee who knows this kavacham; and who worship or recites the mantra one billion times of Goddess Durga, without reciting this kavacham, never receives Sidhi of the mantra. O! Narad I have told this kavacha to you. You are not supposed to give it to everybody who is not a right person to receive it. Thus here completes this Durga Kavacha/BrahmandaVijay Kavacha which is from Brahmavaivarta Poorana and told by God Narayan to Narad.
दुर्गा कवचम् (ब्रह्मांडविजयं)
नारायण उवाच
श्रुणु नारद वक्ष्यामि दुर्गायाः कवचं शुभम् I
श्रीकृष्णेनैव यद् दत्तं गोलोके ब्रह्मणे पुरा II
ब्रह्मा त्रिपुरसंग्रामे शंकराय ददौ पुरा I
जघान त्रिपुरं रुद्रो यद् धृत्वा भक्तिपूर्वकम् II
हरो ददौ गौतमाय पद्माक्षाय च गौतमः I
यतो बभूव पद्माक्ष: सप्तद्वीपेश्वरो जयी II
यद् धृत्वा पठनाद् ब्रह्मा ज्ञानावाश्क्तिमान् भुवि I
शिवो बभूव सर्वज्ञो योगिनां च गुरुर्यतः I
शिवतुल्यो गौतमश्च बभूव मुनिसत्तमः II
ब्रह्मांडविजयस्यास्य कवचस्य प्रजापतिः I
ऋषिःछन्दः च गायत्री देवी दुर्गतिनाशिनी II
ब्रह्मांडविजये चैव विनियोगः प्रकीर्तितः I
पुण्यतीर्थं च महतां कवचं परमाभ्दुतम् II
ओम ह्रीं दुर्गतिनाशिन्यै स्वाहा मे पातु मस्तकम् I
ओम ह्रीं मे पातु कपालं च ओम ह्रीं श्रीमिति लोचने II
पातु मे कर्णयुग्मं च ओम दुर्गायै नमः सदा I
ओम ह्रीं श्रीमिति नासां मे सदा पातु च सर्वतः II
ह्रीं श्रीं ह्रूमिती दंतानि पातु क्लीमोष्टयुग्मकम् I
क्रीम् क्रीम् क्रीम् पातु कंठं च दुर्गे रक्षतु गण्डकम् I
स्कन्धम् दुर्गविनाशिन्यै स्वाहा पातु निरन्तरम् I
वक्षो विपद्विनाशिन्यै स्वाहा मे पातु सर्वतः II
दुर्गे दुर्गे रक्षिणीति स्वाहा नाभिं सदावतु I
दुर्गे दुर्गे रक्ष रक्ष पृष्टं मे पातु सर्वतः II
ओम ह्रीं दुर्गायै स्वाहा च हस्तौ पादौ सदावतु I
ओम ह्रीं दुर्गायै स्वाहा च सर्वांगम् मे सदावतु II
प्राच्यां पातु महामाया आग्नेय्याम् पातु कालिका I
दक्षिणे दक्षकन्या च नैर्ऋत्यां शिवसुंदरी II
पश्चिमे पार्वती पातु वाराही वारुणे सदा I
कुबेरमाता कौबेर्यामैशान्यामीश्वरी सदा II
ऊर्ध्व नारायणी पातु अंबिकाधः सदावतु I
ज्ञाने ज्ञानप्रदा पातु स्वप्ने निद्रा सदावतु I
इति ते कथितं वत्स सर्व मंत्रौघविग्रहम् I
ब्रह्मांडविजयं नाम कवचं परमाभ्दुतम् II
सुस्नातः सर्वतीर्थेषु सर्वयज्ञेषु यत् फलं I
सर्वव्रतोपवासे च तत् फलं लभते नरः II
गुरुमभ्यर्च्य विधिवद् वस्त्रालंकारचंदनै: I
कंठे वा दक्षिणे बाहौ कवचं धारयेत्तु यः II
स च त्रैलोक्यविजयी सर्वशत्रुप्रमर्दकः I
इदं कवचमज्ञात्वा भजेद् दुर्गतिनाशिनीम् II
शतलक्षप्रजप्तोSपि न मंत्र: सिद्धिदायकाः II
कवचं काण्वशाखोक्तमुक्तं नारद सुंदरम् I
यस्मै कस्मै न दातव्यं गोपनीयं सुदुर्लभम् II
इति श्रीब्रह्मवैवर्तपुराणे गणपतीखंडे ब्रह्मांडविजयं नाम दुर्गाकवचं संपूर्णं II
दुर्गा कवच मराठी अर्थ:
श्री नारायण नारदाला सांगत आहेत. नारदा ! फार प्राचीनकाळी श्रीकृष्णाने गोलाकामध्ये ब्रह्मदेवाला जे शुभप्रद कवच दिले, त्याचे वर्णन मी करत आहे. नंतर ब्रह्मदेवाने हे कवच शंकरांना दिले. ज्याचे भक्तीपूर्वक धारण करून श्री शंकरांनी त्रिपुरासुराचा संहार केला. नंतर शंकरांनी गौतमला व गौतमाने पद्माक्षाला दिले. ज्याच्या प्रभावाने पद्माक्ष विजयी होऊन सप्त द्वीपांचा अधिपती झाला. जे वाचून, पठण करून व धारण करून ब्रह्मा ज्ञानवान व शक्तिमान झाले. ज्याच्या प्रभावाने श्री शंकर सर्वज्ञ व योग्यांचे गुरु झाले. मुनी श्रेष्ठ शिवतुल्य मानले जाऊ लागले. या ब्रह्मांडविजय नावाच्या कवचाचे प्रजापती हे ऋषी आहेत. गायत्री छन्द आहे. दुर्गतिनाशिनी दुर्गा देवी आहे. ब्रह्मांडावर विजय मिळविण्यासाठी याचा विनियोग केला जातो. हे परम अद्भुत कवच महापुरुषांसाठी पुण्यतीर्थ आहे.
कवच्याची सुरुवात:
"ओम ह्रीं दुर्गतिनाशिन्यै स्वाहा" हा मंत्र माझ्या मस्तकाचे रक्षण करो. "ओम ह्रीं" हा मंत्र माझ्या कपाळाचे व "ओम ह्रीं श्रीं" हा मंत्र माझ्या डोळ्यांचे रक्षण करो. "ओम दुर्गायै नमः" हा मंत्र माझ्या दोन्ही कानांचे रक्षण करो. "ओम ह्रीं श्रीं" हा मंत्र नेहमी सर्व बाजूनी माझ्या नाकाचे रक्षण करो. "ह्रीं श्रीं हूं" हा मंत्र माझ्या दातांचे आणि "क्लीं" हा मंत्र माझ्या दोन्ही ओठांचे रक्षण करो. "क्रीम् क्रीम् क्रीम्" हा मंत्र माझ्या कंठाचे रक्षण करो. "दुर्गे" हा मंत्र गालांचे रक्षण करो. "दुर्गविनाशिन्यै स्वाहा" हा मंत्र नेहमी माझ्या खांद्यांचे रक्षण करो. " विपद् विनाशिन्यै स्वाहा" हा मंत्र सर्व बाजूनी माझ्या वक्ष:स्थळाचे रक्षण करो. "दुर्गे दुर्गे रक्षणीति स्वाहा" हा मंत्र नेहमी माझ्या नाभिचे रक्षण करो. "दुर्गे दुर्गे रक्ष रक्ष" हा मंत्र नेहमी सर्व बाजूनी माझ्या पाठीचे रक्षण करो. "ओम ह्रीं दुर्गायै स्वाहा" हा मंत्र नेहमी माझ्या हाता पायांचे रक्षण करो. "ओम ह्रीं दुर्गायै स्वाहा" हा मंत्र नेहमी माझ्या सर्वांगाचे रक्षण करो. पूर्व दिशेकडून महामायेने माझे रक्षण करावे. आग्नेय दिशेकडून कालिकामाताने माझे रक्षण करावे. दक्षिण दिशेकडून दक्षकन्येने माझे रक्षण करावे. आणि नैरुत्येकडून शिवसुन्दरीने माझे रक्षण करावे. पश्चिमे कडून पार्वतीने, वायव्येकडून वाराहीने, उत्तरेला कुबेरमातेने आणि ईशान्येला ईश्वरीने नेहमी माझे रक्षण करावे. ऊर्ध्वेला नारायणीने व अध दिशेला अंबिकेने माझे नेहमी रक्षण करावे. जागेपणी ज्ञानप्रदेने व झोपल्यावर निद्रादेवीने माझे रक्षण करावे.
फलश्रुती:
वत्सा! अशा प्रकारे मी तुला हे "ब्रह्मांडविजय" नावाचे कवच सांगितले. हे परम अद्भुत व सर्व मंत्रांचे मुर्तिमान स्वरूप आहे. सर्व तीर्थक्षेत्री स्नान करून, सर्व प्रकारच्या यज्ञांचे अनुष्ठान करून तसेच सर्व प्रकारचे उपवास करून जे फल प्राप्त होते ते फल या कवच्याला धारण करून मिळते. जो विधीपूर्वक वस्त्र, अलंकार आणि चंदनाने गुरूंची पूजा करून या कवच्याला गळ्यांत किंवा उजव्या दंडावर धारण करतो तो सर्व शत्रूंचा पराभव करून त्रैलोक्यांत विजयी होतो. जो हे कवच न जाणता दुर्गतिनाशिनी दुर्गाचे भजन, नामस्मरण करतो; त्याचा मंत्र एक करोडवेळा जपूनही सिद्धिदायक होत नाही. नारदा! हे कण्वशाखोक्त सुंदर कवच, ज्याचे मी वर्णन केले ते अत्यंत गुप्त व दुर्लभ आहे. हे ज्याला त्याला (अश्रद्धावान माणसाला) सांगू नये. अश्या रीतीने हे ब्रह्मवैवर्त पुराणांतील गणेशखंडांतील दुर्गा कवच (ब्रह्मांडविजय) संपूर्ण झाले.
Durga Kavacha BrahmandaVijay Kavacha in marathi
No comments:
Post a Comment